फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचे निधन

839

फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचे निधन

मुंबई / वृत्तसंस्था
बंगाली पुरुषांसाठी फॅशन जगतात रंगीबेरंगी धोतर आणि डिझायनर पंजाबी कुर्त्याचा ‘ट्रेण्ड’ आणणाऱ्या प्रख्यात फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचं आकस्मिक निधन झालं आहे. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळल्या. गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान रात्री त्यांचा मृतदेह बाथरूममध्ये सापडला.
शरबरी दत्ता यांच्या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२.१५ वाजता दत्ता यांचा मृतदेह बाथरूममधून सापडला.

मात्र शरबरीचे कुटुंबीय सांगतात, की ६३ वर्षीय फॅशन डिझायनरला मंगळवारी रात्री जेवताना अखेरचं पाहण्यात आले होते. जेवून झाल्यानतर त्या कोणाशीही बोलल्या नव्हत्या. या प्रकरणात प्राथमिक तपासणीत शरबरी यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे.

परंतु त्यांच्या कुटुंबियांनी ता पूर्णपणे ठीक असल्याचं सांगितलं. त्यांना आरोग्याशी निगडीत कोणताही त्रास नव्हता. सध्या कोलकाता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि शरबरी यांच्या आकस्मिक मृत्यूचं कारण शोधण्यात येत आहे.

त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शरबरी दत्ता या बंगालीतील प्रसिद्ध कवी अजित दत्ता यांच्या मुलगी होत्या. शरबरी गेली अनेक वर्ष फॅशन डिझायनर म्हणून काम करत होत्या. त्या जास्तीत जास्त पुरुषांचे ड्रेस डिझाइन करायच्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here