पोलीस अधिकारी असल्याचे भासवत भामट्याने दोन तोळे लुटले
अहमदनगर :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. दरदिवशी चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
तसेच खोटी माहिती देत लुटमारीच्या घटनांमध्ये देखील चांगलीच वाढ झाली आहे.असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात घडला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे (रा. जवळा, हल्ली रा. म्हसे खुर्द) हे जवळा येथून मेडिकलमधून औषध घेऊन त्यांच्या बंधूंच्या घरी जात असताना
त्यांच्या जवळ एक काळ्या रंगाची दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी आम्ही पोलीस आहोत, असे सांगून त्यांची अंगझडती घेतली. तुमच्या वस्तू तुम्हाला परत देतो, असे सांगून झडती घेतली.





