महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज:

*महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज* आज हवामान खात्यानं उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, परभणी, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय.1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.______________________________________________________

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here