30 ऑगस्ट 2021 महा 24 news हेडलाईन्स
✒️ ईडी लावली तर सीडी लावेन: ती सीडी गेल्या सहा महिन्यांपासून मी पोलिसांकडे दिलेली; अहवाल आला की, योग्य वेळी जाहीर करणार- एकनाथ खडसे यांचा इशारा
✒️ केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने करदात्यांना दिला दिलासा; प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवली 30 सप्टेंबरपर्यंत
✒️ पुणे: ऑफिस बॉयने एटीएम मशीन उघडण्याचा पासवर्ड मित्रांना सांगितला; दौंडमधील कासुर्डीतील IDBI बँकेच्या एटीएममधून 11 लाख 58 हजार रु. लंपास
✒️ आता ट्विटरवरून iOS युजर्सना पैसे कमवता येणार; ट्विटरने Ticketed Spaces हे पेड ऑडिओ रूम फिचर सध्या अमेरिकेत केले लाँच
✒️ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसलेल्या भागात शाळा सुरू करण्याचा टास्क फोर्सचा विचार, 5 सप्टेंबरपर्यंत शिक्षकांचे डबल लसीकरण मोहीम हाती घेणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
✒️ धारावी आग दुर्घटनेत आतापर्यंत 17 जण जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर तर 12 जणांची तब्येत स्थिर
✒️ राज्यात 350 परीक्षा केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न, पुढील 3 ते 4 दिवसात सीईटीच्या तारखा जाहीर होणार; राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहीती
✒️ महाराष्ट्रात 52,844 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,63,416 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,157 रुग्णांचा मृत्यू
✒️ पुणे: वारजे येथील युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त तब्बल 800 जणांच्या फोटोचा बॅनर लावला; बॅनरची चांगलीच चर्चा
✒️ भारतात 3,70,426 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,19,15,969 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,38,387 रुग्णांचा मृत्यू
✒️ ईडीची नोटीस येणार हा अंदाज होताच, आता कायदेशीर बाबींचा विचार करुन योग्य निर्णय घेणार; परिवहन मंत्री अनिल परब यांची प्रतिक्रिया










