औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..

➡️ मोंढा चौकात मुलीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला सिडको पोलिसांनी केली अटक.

➡️ जालना रस्त्यावर रिक्षा चालकाच्या अश्लील वर्तनामुळे युवती जखमी, अँब्युलन्स हेल्प रायडर्स निलेश सेवेकरने युवतीला केली मदत.

➡️ औरंगाबाद रोटरी क्लब अनुदान प्रकल्प अंतर्गत उंडणगाव येथे नवीन सुधारित शवदहिणीचे मोफत वाटप करण्यात आले.

➡️ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील उपळी परिसरात खाटेवर न्यावा लागला मृतदेह.

➡️ शहरात रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, 50 पेक्षा अधिक चालकांना ठोठावला दंड.

➡️ खडकेश्वर परिसरात डॉक्टर महिलेला बळजबरीने विष पाजून मारण्याचा प्रयत्न, पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.

➡️ पुणे येथून अल्पवयीन मुलीला पळवून आणलेल्या दोन युवकांना बिडकीन पोलीसांनी पाठलाग करून पकडले.

➡️ रोटेगाव ते कोपरगाव रेल्वेमार्ग सुरू करा, मराठवाडा रेल्वे कृती समितीकडून केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्याकडे मागणी.

➡️ सिल्लोड तालुक्यातील जंजाळ येथील घटोत्कच लेणीला देशी-विदेशी २०० अभ्यासक आज देणार भेट.

➡️ जायकवाडी पंपहाऊसजवळील १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत.

➡️ माहेरावरून ३ लाख रुपये आणण्यासाठी विवाहित महिलेचा छळ करणाऱ्या ४ जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

➡️ बिबट्याने जबड्यात पकडलेल्या वासराची पिता-पुत्रांनी धाडस करून केली सुटका; सोयगाव तालुक्यातील सोनसवाडी शिवारातील घटना.

➡️ सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी येथील तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू; वडोद बाजार पोलीस ठाण्यात नोंद

➡️ वेदांतनगर गार्डन परिसरातील १६ वाहनांच्या काचा फोडणाऱ्या माथेफिरूची पोलीस कोठडीत रवानगी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here