महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांना राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिल्या भेटी
कृषी विद्यापीठाचे संशोधन आणि विस्तार शिक्षणाचे काम कौतुकास्पद
अहमदनगर: राज्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासात
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे काम महत्वपूर्ण आहे. विविध वाणाची निर्मिती आणि विस्तार शिक्षण यामध्ये कृषी विद्यापीठ करत असलेले काम कौतकस्पद असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
राज्यमंत्री कु. तटकरे यांनी आज कृषी विद्यापीठाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यापीठात होत असलेले संशोधन आणि विस्तार शिक्षण संदर्भात सुरू असलेले काम जाणून घेतले.
त्यांनी उद्यानविद्या विभागाच्या फळपिके प्रात्यक्षिक प्रक्षेत्रास भेट दिली. तेथील स्वयंचलित वायरलेस ठिबक सिंचन प्रणालीची माहिती घेतली. औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पास भेट देऊन औषधी वनस्पती आणि त्यांचे महत्त्व याची माहिती घेतली. याठिकाणी औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नाची माहिती त्यांनी घेतली. बीज प्रक्रिया, बियाणे भांडार केंद्र, डीस्टीलेशन युनिट, भाजीपाला संशोधन प्रकल्प, आंब्याच्या विविध जातींचे प्रक्षेत्र, कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प, रोपवाटिका कार्यालय, आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, सिंचन उद्यान, हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र याठिकाणी त्यांनी भेटी दिल्या.
यावेळी कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील आणि संचालक डॉ. शरद गडाख आदींनी त्यांना माहिती दिली. ***






