श्रीगोंदा,दि.२८ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील ताजु येथील दोन मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेततळ्यामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरी नामदेव कोकरे (वय १५) व विरेंद्र रामा हाके (वय १६) अशी नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील ताजू गावाजवळ असणाऱ्या लोखार येथील मावळे वस्तीवरील हरी आणि विरेंद्र हे दोघेजण शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात गेले होते. याच दरम्यान हरी व विरेंद्र त्यांच्याकडील शेळ्या चरत- चरत थेट शेडगाव शिवारातील भवानी माता मंदिराच्या पुढे आल्या. याठिकाणी पुणे येथील चोपडा यांचे शेततळे आहे. या शेततळ्यामध्ये दुपारी एकच्या सुमारास हरी व विरेंद्र उतरले. त्यांना शेततळ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या परिसरात कोणीच नसल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, सवयीप्रमाणे शेळ्या सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान शेळ्या घरी परतल्या मात्र. मुले आली नाहीत म्हणून घरच्यांनी आजुबाजूच्या परिसरात मुलांना शोधकार्य सुरू केले. याच दरम्यान हरी व विरेंद्रचे कपडे आणि चपला भवानी माता मंदिरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ सापडल्या. यानंतर यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर हरी व विरेंद्र पाण्यात बुडाल्याचे कुटुंबीयांना समजले.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
‘व्हिसामध्ये एकूण विलंबाची अपेक्षा करा’: कॅनडाने कर्मचारी कमी केल्यानंतर भारताला सांगितले
कॅनडाने गुरुवारी सांगितले की भारतीयांच्या व्हिसा अर्जामध्ये मंदी येईल कारण ओटावाने दोन्ही देशांमधील चालू असलेल्या अडथळ्याच्या दरम्यान...
पोषण आहार व विविध योजनांच्या अंमलबजावणीने कुपोषणात घट गत तीन वर्षांत मेळघाटातील मातामृत्यू व...
पोषण आहार व विविध योजनांच्या अंमलबजावणीने कुपोषणात घटगत तीन वर्षांत मेळघाटातील मातामृत्यू व बालमृत्यूत घट
मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत...
दिवसभरातील महत्वाच्या बातम्या
-दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*_
▪️ईडी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा नाही. 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन...
देशदेशात सध्या बुली बाई अॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले...
प्रकरण १८ वर्षांची मुलगी मुख्य आरोपी ? देशात सध्या बुली बाई अॅप (Bulli Bai App) मुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे....






