केंद्र सरकारचं दुकान राज्यांनी दिलेल्या महसुलावर चालतं
मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या होत्या. देशातील सर्व व्यापार, उद्योगधंदे बंद होते. याचा जोरदार फटका देशाला बसला आहे. जीडीची दर घसरला, अर्थव्यवस्था कोसळली त्यामुळे देश मोठ्या अडचणीत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच आहे. आर्थिक अराजक माजले त्यास नोटाबंदीसारखे घातक प्रयोग जबाबदार आहेत. कोणत्याही पुर्वतयारीशिवाय लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या. कोणाचाच कोणाशी मेळ नव्हता, असं म्हणत अग्रलेखातून केंद्रावर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत.
महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, पंजाब, गुजरात, प. बंगाल, आंध्रने स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत वाढवून केंद्राला भक्कम केलं. केंद्राकडे स्वतःची महसुली उत्पन्नाची साधने कमी आहेत. राज्यांनी दिलेल्या महसुलावर केंद्राचे दुकान चालत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, राज्ये केंद्राला जास्त महसूल देतात तर काही राज्ये कायम हाती कटोराच घेऊन दिल्लीत उभी राहतात. काही राज्ये केंद्राला जास्त महसूल देतात तर काही राज्ये कायम हाती कटोराच घेऊन दिल्लीत उभी असल्याचं अग्रलेखात सांगितलं आहे.











