आ. संदिपभैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भजनीमंडळींना साहित्य भेट:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

485

बीड चे लोकप्रिय आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच बाळासाहेब मुळे व त्यांच्या सहका-यांच्या वतीने लिंबागणेश येथिल भजनीमंडळींना तबला ,पेटी, टाळमृदंग आदि साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.
मारोती मंदिरात भेट दिलेले साहित्याचा वापर करून भजनी मंडळीनी भजन गायले, त्याचवेळी आ.संदिप क्षीरसागर यांना अभिष्टचिंतना निमित्त उत्तरोत्तर त्यांची राजकीय भरभराट होऊन त्यांच्याकडून लोकप्रतिनिधी म्हणून समाजाची सेवा घडो अशा शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कार्यक्रमास माजी पं.स.सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, मा.स. बाळासाहेब मुळे,मा.उपसरपंच शेख मुस्तफा, युवा नेते विक्की आप्पा वाणी, मयुर वाणी, चंद्रकांत आवसरे, विलास काटे व भजनी मंडळ पांडुरंग वाणी, बाबुराव वाणी, विनायक मोरे, बिभीषण वाणी, बाजीराव दशमे, आदि उपस्थित होते.

बीड- नवनाथ आडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here