अमेरिकेकडून काबूलच्या हल्लेखोरांचा खात्मा; ड्रोन्सच्या मदतीने उद्धवस्त केले दहशतवादी तळ काबुल :

काबुलमध्ये स्फोट करुन अमेरिकेच्या तेरा जवानांसह अनेक नागरिकांना ठार मारण्याचे कृत्य आयसिस – के या दहशतवादी संघटनेने केल्याचे बायडेन प्रशासनाने जाहीर केले. यानंतर अमेरिकेने ड्रोनद्वारे अफगाणिस्तानमध्ये ‘एअर स्ट्राईक’ केला. ‘एअर स्ट्राईक’ करुन आयसिस – के संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे अमेरिकेने सांगितले. हल्ल्यात काबुलमध्ये स्फोट करण्याची योजना आखणारा आयसिस – के संघटनेचा दहशतवादी ठार झाल्याचे अमेरिकेने सांगितले. आयसिस – के ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या नांगहार प्रांतात कार्यरत आहे. याच प्रांतात अमेरिकेने ‘एअर स्ट्राईक’ केला. ‘एअर स्ट्राईक’मध्ये किती दहशतवादी ठार झाले याची नेमकी आकडेवारी अद्याप अमेरिकेने जाहीर केलेली नाही. याआधी काबुल स्फोटात अमेरिकेच्या तेरा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती अध्यक्ष बायडेन यांनी दिली. अमेरिकेच्या जवानांना लक्ष्य करणाऱ्यांना माफ करणार नाही, त्यांना शोधून त्यांची शिकार करू, असे बायडेन म्हणाले होते. अमेरिकेत वर्ल्ड ट्रेंड सेंटरच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्यांना माफ करणार नाही, त्यांना शोधून त्यांची शिकार करू; असे जाहीर केले होते. यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करुन लष्करी मोहिमेला सुरुवात केली होती. तब्बल दोन दशकानंतर ही मोहीम आवरती घेत अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया सुरू असताना काबुलमध्ये दोन स्फोट करुन अमेरिकेच्या जवानांसह अफगाण नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. परदेशी पलायन करू इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांना मोठ्या संख्येने ठार करण्यात आले. स्फोटात अमेरिकेच्या तेरा जवानांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अमेरिकेने नांगहार प्रांतात ‘एअर स्ट्राईक’ केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here