जळगाव येथे डाक अदालतीचे आयोजन

731


7 सप्टेंबरपर्यंत तक्रारी पाठविण्याचे आवाहन
जळगाव, (जिमाका) दि. 24 – पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, पहिला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव येथे दि. 13 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी अकरा वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर डाक अदालतमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बॅंक, मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत अधिक्षक डाकघर कार्यालय, 1 ला माळा, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव 425001 यांच्या नावे 7 सप्टेंबर, 2021 पर्यंत पाठवावे. असे आवाहन अधिक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी केले आहे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here