नांदेड (जिमाका) दि. 24 :- सुशिक्षीत बेरोजगारांनी स्थापन केलेल्या बेरोजगांराच्या सेवा सहकारी संस्थांची कामे गेल्या अनेक दिवसांपासून रखडली आहेत. सदर प्रश्न हा बेरोजगारांशी निगडीत असल्यामुळे आपल्या विभागार्फत करण्यात येणाऱ्या 3 लाख रुपये किंमतीची कामे विना निविदा देण्याची मागणी आहे. यामध्ये रंगरंगोटी, सजावट, स्वच्छता, साफसफाई, बांधकाम, संशोभिकरण, इमारत दुरस्ती, नवीन साहित्य खरेदी इत्यादी कामे उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार सोसायटयांच्यावतीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आली आहे.
00000







