मारुती सुझुकीची कार स्वस्तात खरेदीची संधी, ४५ हजारांपर्यंत मिळणार डिस्काउंट
नवी दिल्लीः Maruti Suzuki नेक्सा कारवर डिस्काउंट ऑफर केली जात आहे. जर तुम्हाला या महिन्यात नवी कार खरेदी करायची असेल तर मारुती सुझुकी इग्निस, मारुती सुझुकी सियाज आणि मारुती सुझुकी बलेनो या सारख्या कारवर डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या मारुती सुझुकीच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.
या कारला कंपनीने काही वेळा आधी पेट्रोल इंजिन सोबत आणले होते. याआधी ही कार केवळ डिझेल इंजिन सोबत होती. १.५ लीटर पेट्रोल इंजिनच्या या कारवर १० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केले जात आहे.
मारुती सुझुकी बलेनोः ३५ हजारांपर्यंत डिस्काउंट
मारुती सुझुकी बलेनो कंपनीची हॅचबॅक कार आहे. बलेनो देशातील सर्वात प्रसिद्ध हॅचबॅक कार पैकी एक कार आहे. या कारच्या खरेदीवर कंपनी ३५ हजार रुपयां पर्यंत डिस्काउंट देत आहे.
मारुती सुझुकी सियाजः ४० हजारांचा डिस्काउंट
ही कंपनीची फ्लॅगशीप सिडान कार आहे. भारतात या कारची टक्कर होंडा सिटी यासारख्या कारसोबत होते. ही कार या महिन्यात खरेदी केल्यास या कारवर ४० हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. सियाज देशातील सर्वात प्रसिद्ध सिडान कार पैकी एक आहे.
मारुती सुझुकी इग्निसः ४५ हजारांपर्यंत डिस्काउंट
या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन ऑटो एक्स्पो २०२० मध्ये समोर आणले होते. जर तुम्हाला या महिन्यात मारुती सुझुकी इग्निस कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला या कारवर ४५ हजारांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. यात २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, तसेच १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट मिळत आहे.