अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाले होते दाखल

850

अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने झाले होते दाखल

नवी दिल्लीः करोना संसर्गातून बरे झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एम्समध्ये दाखल झालेल्या अमित शहा यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अति शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
अमित शहा यांना एम्सच्या कार्डिओ न्यूरो टॉवरमध्ये दाखल केलं गेलं होतं. करोनातून बरे झाल्यावर (पोस्ट-कोविड उपचारांसाठी) एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. करोनातून बरे झाल्यावर त्यांना ३१ ऑगस्टला डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर त्यांना श्वस घेण्यास त्रास होत होता. यामुळे गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांना पुन्हा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.
गेल्या महिन्यात २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १४ ऑगस्टला त्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह आली. पण चार दिवसांनंतर १८ ऑगस्टला त्यांना कोविडनंतरच्या काळजीसाठी एम्समध्ये दाखल केलं गेलं. त्या काळात त्यांनी रुग्णालयातूनही मंत्रालयाचं काम बघितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here